नमस्ते

मी एक व्यायसायिक डिझाईनर. 2002 साली माझा व्यवसाय सुरू केला. प्रामुख्याने डिझाईन आणि प्रिंटींग सेवा देणे हे माझे काम. कालांतराने आयडेंटीकार्डस्ची कामे फार येऊ लागली. माझ्या डिझाईनिंगच्या सॉफ्टवेअर्सवर काम करताना फार वेळ लागत होता. मग मी सर्च करू लागलो की आयकार्ड बनविण्याचे काही सॉफ्टवेअर मार्केटमध्ये मिळतात का? मग मला एका EXHIBITION मध्ये DGFLICK सॉफ्टवेअरबद्दल माहिती मिळाली. त्यावेळी ती समजून घेऊन सॉफ्टवेअर नक्की घ्यायचे केले, आणि तेथून निघालो. ऑफिसला आल्यानंतर विसरूनच गेलो. पण ज्यावेळी ICARD चे काम आले त्यावेळी पुन्हा DGFLICK चीआठवण आली व ते मी खरेदी केले. या सॉफ्टवेअरमुळे माझी काम फार जलद होऊ लागली. मी ते सॉफ्टवेअर ENJOY करू लागलो. जणू काही जादूचा दिवाच माझ्या हाती लागला, कारण Excel मध्ये data typing तो import करायचा व फोटो फोल्डरची लिंक त्याला जोडायची की काम झाले फत्ते. मग तुमच्या त्या Excel शीटमध्ये कितीही ID Card data असो 2-3 मिनीटांच I CARD प्रिंटींगसाठी व पुढच्या प्रोसेससाठी तयार. आज जवळपास 12-14 वर्षांपेक्षा जास्त काळ मी सॉफ्टवेअर वापरत आहे. सॉफ्टवेअर वापरताना जास्त अडचण आली नाहीच आणि 1-२ वेळा आली तेव्हा टीम DGFLICK ने चुटकीसरशी अडचण दूर केली. टीम DGFLICK सदैव स. 10 ते सायं. 7 पर्यंत आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी रेडी असते. Thank you DGFLICK.

Login

forgot your password?

OR