फोटोग्राफीतून व्हिडीओग्राफीकडे..! डिजिफ्लिक अल्बम एक्स्प्रेस 13.5 हे अल्बम डिझाईन करण्याचे सॉफ्टवेअर मी काही दिवसांपूर्वी अपडेट करून घेतलं. नवनवीन टेम्प्लेट आणि स्वतः डिझाईन करण्यासाठी अनेक आकर्षक क्लिप आर्ट, मास्क, बॅग्राऊंड, शेप्स त्याचबरोबर एडिटिंगचा खूप छान अनुभव आला. यापेक्षाही मला आवडलं ते नव्याने दिलेलं व्हिडीओ एक्स्प्रेस. जेपीजी फाईलचा स्लाईड शो करून पाहता येतो, पण व्हिडीओ एक्स्प्रेसची खासियत म्हणजे प्रत्येक फोटोला अ‍ॅनिमेट करता येतं. इतकंच नाही तर प्रत्येक क्लिप आर्ट, इफेक्ट साजेसा अ‍ॅनिमेट करता येतो. हे सर्व हाय रेझ्युलेशनमध्ये तयार होत असल्याने कितीही मोठ्या स्क्रीनवर आपण याचा आनंद घेऊ शकतो. आजच्या ई युगात हे खूप फायदेशीर आहे.
मी एक तिलक फंक्शनची फोटोग्राफी आणि अल्बमही स्वतःच डिझाइन केला. जेव्हा त्याची व्हिडिओ क्लिप बनवून यू ट्युबवर लोड केली आणि पार्टीला लिंक पाठवली तेव्हा त्यांनी त्याला उत्स्फूर्तपणे दाद दिली. पहिलाच प्रयोग होता या सॉफ्टवेअरचा, पण सर्वांनाच खूप आवडली. एका फोटोग्राफरला आणखी काय हवं.
मी माझ्याकडे असणार्‍या डिजिफ्लिक अल्बम एक्स्प्रेस 11मध्ये आलेल्या समस्येसंदर्भात कॉल केला होता. त्यावर त्यांनी मला व्हर्जन अपग्रेड करा सांगितले. आधी वाटलं कशाला करा आहे ते ठीक आहे, पण नंतर विचार केला दोन हजार रुपये तर द्यावे लागतील. मुख्य म्हणजे फोटोग्राफरने सदैव अपडेट असायला हवे. म्हणून मी व्हर्जन अपडेट केलं आणि त्यानंतर तयार झालेली कलाकृती तुमच्यासमोर आहे. इंजिनिअरिंग आणि मार्केटिंगमधील ज्या लोकांनी मला याबाबत माहिती दिली त्यांना मनापासून धन्यवाद! थँक्स डिजिफ्लिक!!

Login

forgot your password?

OR